RPF Recruitment 2024 : सरकारी नोकरीची संधी! आरपीएफमध्ये 2250 पदांवर भरती, सविस्तर माहिती वाचा


RPF Recruitment 2024 : रेल्वे संरक्षण दल (Railway Protection Force) म्हणजेच आरपीएफ (RPF) मध्ये बंपर भरती सुरु झाली आहे. आरपीएफने उपनिरीक्षक (Sub-Inspector) आणि हवालदार (Constable) पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. 2 जानेवारीपासून या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराने rpf.Indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करावा.

आरपीएफमध्ये नोकरीची संधी

आरपीएफ 2024 भरतीअंतर्गत 2250 रिक्त जागांवर भरती करण्यात येत आहे. आरपीएफकडून रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि रेल्वे सुरक्षा विशेष बल (RPSF) यामध्ये उपनिरीक्षक (Sub-Inspector) आणि हवालदार (Constable) पदांवर भरती करण्यात येणार आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर लगेचच या भरतीसाठी अर्ज दाखल करा. या भरतीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 पेक्षा जास्त असावे.महत्त्वाची माहिती

रिक्त जागा : 2250 

अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख : 2 जानेवारी 2024

या भरती मोहिमेद्वारे रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि रेल्वे सुरक्षा विशेष बल (RPSF) मध्ये कॉन्स्टेबलच्या 2000 पदांवर भरती केली जाईल. तसेच उपनिरीक्षकांची 250 पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी 10 टक्के पदे माजी सैनिकांसाठी आणि 15 टक्के महिला उमेदवारांसाठी आहेत. उमेदवार आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रियेशी संबंधित तपशील खाली तपासू शकतात.

RPF Constable SI Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

या भरती मोहिमेअंतर्गत, उपनिरीक्षक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तर हवालदार पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. 

RPF Constable SI Recruitment 2024 : वयोमर्यादा

या भरती मोहिमेअंतर्गत उपनिरीक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 20 वर्षे ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे. तर, कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 वर्षे ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे. दरम्यान, अर्ज करणाऱ्या उमेदवार राखीव प्रवर्गातील असल्यास त्याला नियमानुसार वयाच्या मर्यादेत सवलत मिळेल.

RPF Constable SI Recruitment 2024 : निवड कशी केली जाईल?

या पदांसाठी उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (CBT), शारीरिक चाचणी (PET) आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवरील माहिती वाचू शकतात.Spread Love:

Leave a Comment