MPSC : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची अधिसूचना जारी (274 जागा)


एमपीएससी तयारी करणाऱ्या उमेदवांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची अधिसूचना नुकतीच जारी केली आहे. या भरती मार्फत विविध पदांच्या 274 जागा भरल्या जातील. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया 05 जानेवारी पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2024 आहे.एकूण जागा :274 जागा
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

  1. सामान्य प्रशासन विभाग, राज्य सेवा गट-अ व गट-ब – 205 पदे
  2. शैक्षणिक पात्रता: पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  3. मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब – 26 पदे
  4. शैक्षणिक पात्रता:सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
  5. महसूल व वन विभाग महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब – 43 पदे

शैक्षणिक पात्रता: वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य
वयोमर्यादा:
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹344/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
https://mpsconline.gov.in/candidate
अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 जानेवारी
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2024परीक्षेचे वेळापत्रक:
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 28 एप्रिल 2024
राज्य सेवा मुख्य परीक्षा-2024 14 ते 16 डिसेंबर 2024
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा-2024 23 नोव्हेंबर 2024
महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-2024 28 ते 31 डिसेंबर 2024
पूर्व परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 केंद्र.

Spread Love:

Leave a Comment