नमस्कार मित्रांनो, आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबर 2023 पासून अनेक महत्त्वाचे बदल देशात सरकार कडून केले जाणार आहेत, ज्याचा परिणाम थेट सर्व सामान्यांच्या खिशावर पडणार आहे. अगोदरच महागाईनं पिछडलेल्या सर्वसामान्य जनतेला आज आणखी एक सरकार कडून झटका बसलेला आहे. lpg-new-rates
आजपासून व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये तेल वितरण कंपन्यांकडून मोठी वाढ करण्यात आलेली आहे. ही दरवाढ झाल्यानंतर 19 किलोचा commercial सिलेंडर जवळपास 209 रुपयांनी महागलेला आहे.
दिल्लीमधील LPG सिलेंडरच्या किंमती –
नवरात्री व तसेच दसरा यांसारखे सण या चालू झालेल्या ऑक्टोबर महिन्यात साजरे केले जाणार आहेत.अशामधे सणासुदीच्या काळात तेल कंपन्या कडून एलपीजीच्या किमतींमध्ये मोठी वाढ करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावरचा ताण यामुळे वाढणार आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशाची राजधानी दिल्लीमध्ये 209 रुपयांची दरवाढ झाल्यानंतर 19 किलो व्यावसायिक सिलेंडरसाठी आता सुमारे 1,731.50 रुपये आकारले जातील. तर,19 किलो व्यावसायिक LPG सिलेंडरसाठी देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये 1684 रुपये आकारण्यात येतील.
व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतींमध्ये यापूर्वी म्हणजेच 1 सप्टेंबर 2023 मध्ये जवळपास 157 रुपयांनी कपात करण्यात आली होती आणि आता ऑक्टोबर मध्ये त्यापेक्षा अधिक वाढ करण्यात आलेली दिसत आहे.
घरगुती गॅस सिलेंडरची किमत-
तब्बल 200 रुपयांची मोठी कपात महिन्याभरापूर्वी केंद्र सरकार कडून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये केली होती. यानंतर 1 ऑक्टोबर रोजी म्हणजे या चालू झालेल्या महिन्यामध्ये घरगुती एलपीजीच्या किमतींत कुठलाही बदल सरकार कडून करण्यात आलेला नाही.
केवळ व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये तेल कंपन्यांकडून बदल केले असून,घरगुती LPG सिलेंडरच्या किमती जुन्याच दरांवर कायम ठेवलेल्या आहेत. दिल्लीमध्ये 14.20 किलोचा घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 903 रुपये आहे,कोलकात्यामध्ये 929 रुपये आहे , मुंबईमध्ये 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपयांना घरगुती LPG सिलेंडर मिळत आहे.
LPG गॅस घरगुती भाव
घरगुती गॅस सिलेंडरची किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.जिल्ह्यानुसार दर खालील प्रमाणे दिलेले आहेत.⬇️
शहर | गॅस भाव |
अहमदनगर | 916.50 |
अकोला | 923 |
अमरावती | 936.50 |
छत्रपती संभाजीनगर | 911.50 |
भंडारा | 963 |
बीड | 928.50 |
बुलढाणा | 917.50 |
चंद्रपूर | 951.50 |
धुळे | 923 |
गडचिरोली | 972 |
गोंदिया | 971 |
मुंबई | 902.50 |
हिंगोली | 928.50 |
जळगाव | 908.50 |
जालना | 911.50 |
कोल्हापूर | 905.50 |
लातूर | 927.50 |
मुंबई शहर | 902.50 |
नागपूर | 954.50 |
नांदेड | 928.50 |
नंदुरबार | 915.50 |
नाशिक | 906.50 |
धाराशिव | 927.50 |
पालघर | 914.50 |
परभणी | 929 |
पुणे | 906 |
रायगड | 913.50 |
रत्नागिरी | 917.50 |
सांगली | 905.50 |
सातारा | 907.50 |
सिंधुदुर्ग | 917 |
सोलापूर | 918 |
ठाणे | 902.50 |
वर्धा | 963 |
वाशिम | 923 |
यवतमाळ | 944.50 |
सप्टेंबरमधील LPG सिलेंडरचे दर-
सप्टेंबर 2023 मध्ये व्यावसायिक LPG सिलेंडरचे दर घटल्यानंतर याची किंमत दिल्लीमध्ये केवळ 1,522 रुपये झाली होती. एक ऑक्टोबर 2023 बाबत दिल्ली व्यतिरिक्त इतर महानगरांबाबत सांगायचे झाले , तर 19 किलो ग्रामचा एलपीजी Cylinder 1636 रुपयाला नाही, तर 1839.50 रुपयांना कोलकातामध्ये मिळणार आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये याची किंमत 1482 रुपयांवरुन थेट 1684 रुपये एवढी झालेली आहे. व तसेच 1898 रुपयांवर चेन्नईमध्ये पोहोचली आहे.
सरकारकडून दिलेला दिलासा-
केंद्र सरकारनं 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 30 ऑगस्ट 2023 रोजी जवळपास 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेऊन देशातील सर्वसामान्य जनतेला महागाईपासून मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची राजधानी दिल्लीमध्ये किंमत 1103 रुपयांवरून 903 रुपयांवर आलेली आहे.
घरगुती LPG सिलेंडरचे दर 200 रुपयांनी इतर अनेक शहरांमध्ये कमी झालेले दिसत आहेत. याशिवाय, उज्ज्वला योजनेंतर्गत उपलब्ध एलपीजी गॅस सबसिडी देखील जवळ जवळ 400 रुपये करण्यात आलेली आहे. उपलब्ध असलेल्या एलपीजी सिलेंडरची किंमत या योजनेअंतर्गत 703 रुपयांपर्यंत खाली आलेली दिसत आहे.