Board Exam New pattern

12th Exam Pattern : आता बारावीची अंतिम परीक्षा १०० ऐवजी ८० गुणांचीच घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे जाहीर करण्यातआली आहे.

शिक्षण खात्याने (Education Department) बारावीच्या परीक्षेत (12th Exam) बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे बारावीचा वार्षिक पेपर १०० ऐवजी फक्त ८० गुणांचा असणार आहे. तर २० गुण अंतर्गत मूल्यमापन आणि वर्षभरातील परीक्षांमधील गुणवत्तेच्या आधारे दिले जाणार आहेत.

शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या या निर्यणयामुळे आता बारावीच्या विद्यार्थ्यांना वर्षभरात होणाऱ्या चाचणी परीक्षा व कॉलेजकडून दिले जाणारे विविध प्रोजेक्ट देखीलसादर करावे लागणार आहेत.

त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्षभर अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे लागणार असून शिक्षण खात्यातर्फे वर्षभरात घेतल्या जाणाऱ्या तीन चाचणी परीक्षांमध्येही चांगले गुण घ्यावे लागणार आहेत. तीन परीक्षांपैकी दोन परीक्षांमधील गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना दहा गुण दिले जाणार आहेत. परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांचे हे दहा गुण ऑनलाईनद्वारे अपलोड केले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांमधील संशोधनात्मक दृष्टिकोन वाढावा, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट तयार करावे लागणार आहेत. विद्यार्थ्याने प्रोजेक्ट कशाप्रकारे तयार केला आहे.

यासाठी पाच गुण तर तोंडी प्रश्नांसाठी पाच गुण दिले जाणार असून, हे गुण देखील परीक्षेपूर्वी कॉलेजांच्यावतीने अपलोड केले जाणार आहेत.

त्यामुळे, परीक्षेचा निकाल जाहीर होताना या वीस गुणांचे महत्त्व देखील वाढणार आहे. विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेतील पेपरबरोबरच मूल्यमापनाद्वारे दिल्या जाणाऱ्या २० गुणांसाठीही चांगली तयारी करावी लागणार आहे. प्रत्येक कॉलेजनेने परीक्षेतील बदलाबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, अशी सूचनाही शिक्षण खात्याच्यावतीने जाहीर केली आहे.

Spread Love:

Leave a Comment