Anganwadi helper bharti: बाल विकास प्रकल्प आंगनवाड़ी मदतनिस भर्ती शैक्षणिक पात्रता फक्त 12 वी पास असा करा अर्ज

Anganwadi helper Bharti: बाल विकास प्रकल्प भर्ती २०२३ ने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे ज्यात अंगणवाडी मदतनीस या पोस्टसाठी अर्ज सुरु केले आहेत.

पात्र आणि इच्छुक उमेदवार ३० जुलै २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी बाल विकास प्रकल्प भरतीसाठी अर्ज सादर करू शकतात.

Anganwadi helper bharti details in marathi:

  • विभागाचे नाव : बाल विकास प्रकल्प
  • जागा: 800+
  • पोस्टचे नाव : आंगनवाड़ी मदतनिस
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता : १२ वी पास व त्या त्या जागचे रहीवाशी
  • पगार दरमहा : रु ७२०० ते रु.५५००/- दरमहा

लातूर जिल्हा एकूण जागा आणि आंगनवाड़ी मदतनिस भर्तीची माहिती:

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) लातूर शहर यांचे कार्यालय अंतर्गत ३८ रिक्तपदांच्या अंगणवाडी मदतनिस भरती प्रक्रिया सन २०२३ साठी लातूर शहरातील महानगरपालिका क्षेत्रातोल अंगणवाडी मदतनिस रिक्त मानधनी तत्वावरील पदांसाठी एकत्रित मानथनी तत्त्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने लातूर शहरातील पात्र महिला उमेदवारांकडून खालौल अटी ब शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागविप्यात येत आहेत.

अटीशर्ती:

  1. शैक्षणिक पात्रता :- अंगणवाडी मदतनिस पदासाठी अर्जदार किमान १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इ. १२ विचे गुणपत्रकाची सत्यप्रत आवश्यक असुन सदरील गुणपत्रक नसल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. यापेक्षा उच्चत्तम शैक्षणिक अर्हता धारण करणा-या उमेदवाराने आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या व गुणपत्रिकांच्या सत्यप्रती सादर कराव्यात.
  2. वास्तव्याची अट (स्थानिक रहिवाशी अट) : उमेदवार महिला स्थानिक रहिवाशी असावी. स्थानिक रहिवाशी म्हणजेच लातूर शहरातील अंगणवाडी मदतनिस पदासाठी अर्ज केलेला असेल तर लातूर शहरातीलच रहिवाशी महिला अर्जदार असणे आवश्यक आहे. यासाठी लातूर शहरातील रहिवाशी म्हणुन शासकिय दस्तऐवज (आधारकार्ड / मतदान ओळखपत्र) जोडणे आवश्यक आहे.
  3. वयाची अट :- अंगणवाडी मदतनिस या पदासाठी वयोमर्यादा किमान १८ वर्षे व कमाल ३५ वर्षे राहिल. तसेच विधवा उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे राहिल. वयाचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला किंवा १०वी उत्तीर्ण बोडांचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक राहिल. उमेदवाराचे किमान व कमाल वय हे जाहिरात प्रसिध्दीच्या दिनांकास गणना करण्यात येईल.
  4. लहान कुटुंब:- वरील पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांस लहान कुटुंबाची अट लागू राहिल. उमेदवारांस दोन पेक्षा जास्त हयात अपत्ये (दत्तक दिलेल्या अपत्यांसह) नसावीत. अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात लहान कुटुंबाबाबतचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक राहिल. अन्यथा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल,
  5. मराठी भाषेचे ज्ञान :- अंगणवाडी मदतनिस पदासाठी अर्ज करणा-या महिला उमेदवारांना मराठी भाषेसोबतच हिंदी/उर्दू भाषेचे ज्ञान (लिहिता ब वाचता येणे) असणे आवश्यक आहे. तथापि अशा उमेदवाराने इ.१० वी अथवा त्यापुढील शैक्षणिक अरहतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहिल.
  6. मेदवार विधवा असल्यास :- महानगरपालिका/ नगरपालिका यांचे कडील पतीचे मृत्यु प्रमाणपत्र जोडावे.
  7. उमेदवार अनाथ असल्यास संबंधित विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास विभाग यांचे प्रमाणपत्र जोडावे.
  8. मागासवर्गीय उमेदवारांनी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावा.
  9. अनुभव : उमेदवारास एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंगणवाडी सेविका / मिनी अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनिस म्हणुन कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असल्याशिवाय अनुभवासाठी असलेले गुण देण्यात येणार नाहीत. असा अनुभव उमेदवारांस असल्यास त्याबाबतचे सक्षम अधिका-याचे अनुभव प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. मान्यता प्राप्त
    खाजगी व स्वयंसेवी, अनुदानित/विना अनुदानित संस्थेतील कामाचा अनुभव ग्राहय धरला जाणार नाही व याबाबतचा कोणताही युक्तिवाद उमेदवाराने केल्यास अपात्र ठरविण्यात येईल.
  10. उमेदवाराने अर्जामध्ये शहराचे नांव, ज्या पदासाठी अर्ज करावयाचा आहे त्या पदाचे नांव याचा स्पष्ट उल्लेख करावा. अन्यथा अजांचा विचार केला जाणार नाही.

अर्ज स्विकारण्याचा कालावधी दि.१६.०६.२०२३ ते दि. ३०.०६.२०२३ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत (कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून)

अर्ज स्विकारण्याचे स्थळ:- बाल विकास प्रकल्प्‌ अधिकारी;वर्ग-१ (नागरी प्रकल्पू) त्रिमुर्ती भवन, उदय पेट्रोल पंप जवळ बारशी रोड,लातूर.

बुलढाणा जिल्हा एकूण जागा आणि आंगनवाड़ी मदतनिस भर्तीची माहिती:

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ग्रामीण) देऊळगावराज जि.बुलडाणा अंतर्गत स्थानिक महिला उपेदवारांकडुन मौजे १) गारखेड २) मेव्हुणाराजा ३) अंभोरा ४) पांगरी ५) गिरोली खुर्द ६) पिंप्री आंधळे ७) म. ८) मंडपगाव – ३१७, या गावातील प्रत्येकी ०१ अंगणवाडी मदतनिसचे पद विहीत अटी व शर्ती नुसार भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता किमान १२ वी उत्तीण॑ व वय किमान १८ ते कमाल ३५ वर्षे, विधवा महिला असल्यास कमाल ४० वे असावे.

पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज दि.१६/०६/२०२३ ते ३०/०६/२०२३ पर्यंत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय देऊळगावराजा जि. बुलडाणा येथे सादर करावेत. सविस्तर जाहिरात, अटी शर्ती व अर्जांचा नमुनः प्रकल्पाचे व संबधीत ग्रामपंचायतीचे नोटीस बोर्ड वर पाहण्यात यावे.

Anganwadi helper bharti
Anganwadi helper bharti

असा करा अर्ज येथे क्लिक करा

अहमदनगर जिल्हा एकूण जागा आणि आंगनवाड़ी मदतनिस भर्तीची माहिती:

महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक-एबावि-2022 /प्र.क्र.१4/ का-6 दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अहमदनगर पूर्व या कार्यालय अंतर्गत येणाऱ्या नेबासा, जामखेड, कर्जत, शेवगाव या शहरातील नगर पालिका / नगर पंचायत क्षेत्रातील मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे सरळ नियुक्तीन भरण्यासाठी पात्र स्थानिक रहिवासी असलेल्या महिला उमेदवारांकडुन दिनांक १०/०७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदाच्या सरळ नियुक्‍तीसंदर्भात आवश्यक शेक्षणिक पात्रता, अटी व शर्ती वर दिल्या आहेत. बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी ) अहमदनगर पूर्व नागुल बिल्डींग, पहिला मजला, डॉ.घोरपडे हॉस्पीटल जवळ, दिल्ली गेट, अहमदनगर ४१४००१ या कार्यालयाच्या पत्यावर कार्यालयीन वेळेत समक्ष किंवा पोस्टाने विहीत मुदतीत सादर करावा.

सातारा जिल्हा एकूण जागा आणि आंगनवाड़ी मदतनिस भर्तीची माहिती:

महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. एबाबि-२०२२/ प्र.क्र.९४/ का-६. दिनांक ०२ फेब्रूवारी, २०२३ नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल बिकास प्रकल्प अधिकारी (नागरी) सातारा पश्‍चिम या प्रकल्पांतर्गत रिक्‍त असलेली अंगणवाडी मदतनिस यांची मानधनी पदे सरळ नियुक्‍तीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणी करण्यात येत आहे.

अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक – ३०/०६/२०२३ सायं. ०६.१५ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा डाकेद्वारे (पोस्टाद्वारे) विलंबाने पोहचलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण- बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) सातारा पश्‍चिम, केदार बिल्डींग, पहिला मजला. हाँटेल ग्रौन फोल्ड शेजारी, उत्तेकर नगर, सदर बझार, सातारा ४१५००१ दुरध्वनी
क्रमांक – ०२१६२- २२६१२८

सर्व जिल्ह्यांची एकूण जागा आणि आंगनवाड़ी मदतनिस भर्तीची माहिती आणि फॉर्मची pdf:

अ. क्र. जिल्हाएकूण जागा अर्जाचा  शेवटचा दिनांकजाहिरात आणि फॉर्मची pdf पहा 
01लातूर6030 जूनpdf
02बुलढाणा0830 जुलैpdf
03अहमदनगर13710 जूनpdf1 pdf2 pdf3
04सातारा5930 जूनpdf
05अमरावती15403 जुलैpdf1 pdf2
06कोल्हापूर9103 जुलैpdf1 pdf2 pdf3
07नवी मुंबई3128 जूनpdf
08परभणी4203 जुलैpdf
09नांदेड14110 जुलैpdf1 pdf2
10जलगाव3806 जुलैpdf 
11सोलापूर0906 जुलैpdf 
12कोल्हापूर9105 जुलैpdf1 pdf2 pdf3
13अकोला व वाशिम1714 जुलैpdf 

आंगनवाड़ी मदतनिस भर्ती

अर्जासोबत जोडावयाची साक्षांकीत केलेली कागदपत्रेः-

  • १. उमेदवाराचे विवाहपु्वीचे नाव व विवाहनंतरचे नाव या दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याबबत राजपत्र सत्यप्रत किंवा रु. १००/- चे स्टॅम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र यापैकी एक.
  • २. जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / दहावी प्रमाणपत्र याची साक्षांकीत प्रत.
  • ३. उमेदवार अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती / भटक्या जमाती / शार्थिक दृष्टया दुर्बल घटक / विशेष मागास प्रवर्ग मधील असल्यास सक्षम प्राधिकार्‍याचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत.
  • ४.आधारकार्ड / निवडणूक ओळखपत्र /रेशनकार्ड
  • ५.उमेदवार संबंधीत महानगर पालीका / नगरपरिषद/ नगरपंचायत/ क्षेत्रातील रहिवाशी असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र.
  • ६. लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र.
  • ७.उमेदवार विधवा किंवा अनाथ असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.
  • ८. इयत्ता १२ बी उत्तोर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष), पदवीधर, पदव्युत्तर, डी.एड,बी.एड. एम.एस.सी.आय.टी. गुणपत्रक व प्रमाणपत्र यांच्या साक्षांकीत प्रती.
  • ९. अगणवाडी सेविका / मदतनिस /मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी २ वर्षाचा अनुभव असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे अनुभव प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत.
Spread Love:

Leave a Comment