सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट सानुग्रह अनुदान मिळणार – Onion Farming

Onion Farming

Onion Farming : नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात जेवढे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

ती आनंदाची बातमी म्हणजे सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र मध्ये जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना सरसकट सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे. आज आपण सानुग्रह अनुदानाबद्दल संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र मध्ये कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी राजा हा चिंतेमध्ये गेला होता. आणि त्यांना थोडीफार मदत करण्याचे हेतूने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे.

परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किती रुपयांचे सानुग्रह अनुदान सरकार देणार आहे. याची माहिती आपण पुढील प्रमाणे पाहून घेऊया.

Onion Farming

सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रातील बाजारपेठेमध्ये लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे भारत देशातील इतर राज्यांमध्ये सुद्धा कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या परिस्थितीमध्ये आता सध्या कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे.

कांदा हा नाशवंत असल्यामुळे कांद्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. महाराष्ट्रातील कांदा हे नगदी पीक असून त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा भाव हा अतिशय संवेदनशील भाग आहे.

म्हणून या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून एक समिती नेमण्यात आलेली होती.

या समितीमार्फत कांद्याला ३०० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे असे देखील मुख्यमंत्री यांनी अधिवेशनात बोलताना सांगितले आहे. Onion Farming

Spread Love:

Leave a Comment