महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ! तब्बल ‘इतके’ दिवस राज्यात पाऊसच पडणार नाही, भारतीय हवामान विभागाने काय सांगितलं ?

Maharashtra August Havaman Andaj : राज्यात गेल्या दहा ते बारा दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील काही भागात फक्त पावसाचा जोर कमी झाला आहे असं नाही तर पाऊसच पडत नाहीये. राज्यातील काही भागात रिमझिम पाऊस देखील पाहायला मिळत नाहीये.

यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा लागल्या आहेत. कोकणात अधून-मधून पावसाच्या सऱ्या बरसत आहेत पण राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे खरिपातील पिके करपण्याचा धोका तयार झाला आहे.

अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून पावसाबाबत एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या नवीन सुधारित हवामान अंदाजानुसार, राज्यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात पावसासाठी आणखी एक आठवडा म्हणजेच सात दिवसांचा कालावधी वाट पाहावी लागणार आहे.

पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रासह दक्षिण भारतात आगामी सात दिवस पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या माध्यमातून नुकताच समोर आला आहे. भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विटरवर याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

होसाळीकर यांनी असे ट्विट केले आहे की, 18 ते 24 ऑगस्ट महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विशेषता विदर्भाला संलग्न असलेल्या जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर, 25 ते 31 ऑगस्ट या काळात विदर्भ, कोकण, मध्य प्रदेश, ओडीशा, छत्तीसगड या भागातही पाऊस बरसणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

पण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात सरासरी इतका पाऊस किंवा मोठ्या पावसाची शक्यता फारच कमी आहे. निश्चितच, ऑगस्ट महिना अर्धा संपत चालला आहे आणि या महिन्यात महाराष्ट्रात कुठेच जोरदार पाऊस झालेला नाही. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिकांबाबत चिंता वाढू लागली आहे.

विशेष म्हणजे जर मान्सून काळात कमी पाऊस पडला तर रब्बी हंगाम देखील मोठ्या प्रमाणात प्रभावित होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना जोरदार पावसाची आतुरता लागली असून अगदी मान्सूनच्या सुरुवातीला ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट पाहतो त्याचप्रमाणे सध्या बळीराजा आभाळाकडे नजरा ठेवत पावसाची वाट पाहत आहे.

Spread Love:

Leave a Comment