नवीन GR आला ! कुटुंबातील सर्व व्यक्तींना मिळणार घरकुल योजनेचा लाभ – PM Awas Yojana

PM Awas Yojana

PM Awas Yojana : एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कुटुंब प्रमुखाच्या नावावरच संपूर्ण जागा असल्याने फक्त त्याच एका व्यक्तीला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळत होता. कुटुंबातील अन्य व्यक्ती योजनेसाठी पात्र असून सुद्धा त्यांना घरकुल योजनेचा लाभ घेता येत नव्हता परंतु आता या योजनेत नव्याने बदल करण्यात आलेले आहेत.

केंद्र शासनाच्या माध्यमातून नवीन GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्या GR नुसार जर एका कुटुंबात पाच व्यक्ती असतील आणि घरकुल योजनेसाठी ते सर्व पात्र असतील तर त्या सर्व व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे. अशाप्रकारे शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आज आपण या नवीन GR बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या नवीन GR हा तीन मार्च 2023 रोजी शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या शहरी गट क्रमांक चार आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (BLC) एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थ्यांना सामायिक जागेवर बहुमली इमारत बांधण्यास परवानगी देणेबाबत हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

PM Awas Yojana

जे नागरिक आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत अशा लाभार्थ्यांना स्वतःच्या मालकीच्या जागेवरती घरकुल बांधण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते.

त्यामध्ये केंद्र शासनाने दिनांक 5 जानेवारी 2019 रोजी सुधारणा केली असून त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत पात्र कुटुंबातील सज्ञान कमावता व्यक्ती हा प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलासाठी पात्र ठरविण्यात आलेला आहे.

अशा परिस्थितीत एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कुटुंब प्रमुखाच्या नावावर संपूर्ण जागा असल्याने कुटुंबातील इतर पात्र लाभार्थ्यांना नावावर जागा नसल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना शहरीचा लाभ घेता येत नसल्याने सरकारच्या निदर्शनास आले आहे.

त्यामुळे आता एकाच कुटुंबातील परंतु सामाईक जागा असलेल्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत बांधकाम करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. PM Awas Yojana

Spread Love:

Leave a Comment