दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात भरती
DTP Maharashtra Bharti 2023 : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे, कोकण नागपुर, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती जिल्ह्यामध्ये हि संधी असून, बेरोजगार उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची हि सुवर्णसंधी आहे, कमी शिक्षण असले तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे हि संधी वाया न घालवता उमेदवाराने लवकरात लवकर अर्ज सादर करावेत.डीटीपी मधील यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचे आहे. सदर भरतीसाठी उमेदवारांकडून फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. यासोबतच, रोजगार व स्वयंयोजनालयाच्या http://ese.mah.nic.in/ या वेबसाइटवरही ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.पदांचा तपशील :संस्था : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग (Department of Town Planning and Valuation, Government of Maharashtra)

एकूण रिक्त पदे : १२५ जागा

भरले जाणारे पद : शिपाई (गट-ड )

नोकरीचे ठिकाण : पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती विभाग

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

सदर पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :

किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
मागासवर्गीय, खेळाडू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादेत ५ वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे.
तसेच, दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे.
शासन निर्णय आणि तरतुदींनुसार माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत विहित वयोमर्यादेतील सूट हि यांच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक ३ वर्षे इतकी राहील.
वेतन विषयक :

१५ हजार ते ४७ हजार ६०० रुपयांपर्यत (शिवाय, नियमानुसार अनुज्ञेय भत्ते)

परीक्षा शुल्काविषयी :राखीव प्रवर्ग : ९०० रुपये
अराखीव प्रवर्ग : १००० रुपये
(उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील)

वेबसाइट तपासात राहणे अनिवार्य :
० शासनाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदभरती संदर्भातील संक्षिप्त तपशील देण्यात आला आहे.
० अर्ज स्वीकारण्याची पद्धत, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, पदाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या इत्यादी बाबींचा तपशील अधिकृत वेबसाइटवर ‘सर्वसाधारण सूचना’मध्ये प्रसिद्ध करतेवेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
० भरती प्रक्रियेतील तारखांमधील बदल, सूचना आणि इतर सगळ्या तपशीलाची माहिती वेळोवेळी अधिकृत वेबसाइटवरच प्रसिद्ध करण्यात येईल.
० त्यासाठी उमेदवाराने वेबसाइट तपासात राहणे अनिवार्य असेल.उमेदवारांनी याकडे लक्ष द्या :

उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने अधिकृत लिंक वरूनच सादर करायचे आहेत,ऑफलाइन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. .
भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सध्या स्थितीत चालू असलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करायचा आहे.
अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.

Spread Love:

Leave a Comment