गॅस सिलेंडरची किंमत झाली कमी नवीन दर जाहीर

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या व्यवसाय सिलेंडर गॅस आणि घरगुती सिलेंडर गॅस यांच्या किमती जाहीर करत असतात त्याचप्रमाणे आज एक ऑगस्ट रोजी नवीन किमती जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस असून तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. जुलै महिन्यात सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यानंतर सिलेंडरच्या दरात घसरण दिसून येत आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी 1 ऑगस्टच्या सकाळी व्यावसायिक सिलिंडर 100 रुपयांनी कमी केली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरसाठी आता 1680 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी यासाठी 1780 रुपये मोजावे लागत होते. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे नवे दर १ ऑगस्टपासून लागू झाले आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यासाठी राजधानी दिल्लीत पूर्वीप्रमाणेच ११०३ रुपये मोजावे लागतील. दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर १७८० रुपयांवरून १६८० रुपयांवर आला आहे. कोलकातामध्ये पूर्वी 1895.50 रुपयांच्या तुलनेत आता 1802.50 रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे मुंबईत पूर्वी 1733.50 रुपयांना उपलब्ध होता, जो आता 1640.50 रुपयांना उपलब्ध होईल. चेन्नईतील किंमत 1945.00 रुपयांवरून 1852.50 रुपयांपर्यंत खाली आली आहे.

सिलिंडरच्या दरात २७ दिवसांनी कपात

तेल कंपन्यांनी 27 दिवसांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. याआधी 4 जुलै रोजी कंपन्यांकडून सिलेंडरमागे 7 रुपयांची वाढ करण्यात आली होती. जुलैपूर्वी मार्च, एप्रिल, मे आणि जूनमध्ये सिलिंडरच्या किमती कमी झाल्या होत्या. 1 मार्च 2023 रोजी सिलिंडरची किंमत 2119.50 रुपये होती. त्यानंतर एप्रिलमध्ये ते 2028 रुपये, मेमध्ये 1856.50 रुपये आणि 1 जून रोजी 1773 रुपये झाले. मात्र त्यानंतर जुलैमध्ये 7 रुपयांची वाढ झाली आणि दिल्लीत सिलिंडर 1780 रुपयांचा झाला.

LPG गॅस घरगुती भाव

शहर गॅस भाव
अहमदनगर 1116.50
अकोला 1123
अमरावती 1136.50
छत्रपती संभाजीनगर 1111.50
भंडारा 1163
बीड 1128.50
बुलढाणा 1117.50
चंद्रपूर 1151.50
धुळे 1123
गडचिरोली 1172.50
गोंदिया 1171.50
मुंबई 1102.50


हिंगोली 1128.50
जळगाव 1108.50
जालना 1111.50
कोल्हापूर 1105.50
लातूर 1127.50
मुंबई शहर 1102.50
नागपूर 1154.50
नांदेड 1128.50
नंदुरबार 1115.50
नाशिक 1106.50
उस्मानाबाद 1127.50


पालघर 1114.50
परभणी 1129
पुणे 1106
रायगड 1113.50
रत्नागिरी 1117.50
सांगली 1105.50
सातारा 1107.50
सिंधुदुर्ग 1117
सोलापूर 1118.50


ठाणे 1102.50
वर्धा 1163
वाशिम 1123
यवतमाळ 1144.50

Spread Love:

Leave a Comment