गाय म्हैस व शेळयांसाठी मिळणार 80 हजार रुपये अनुदान

Buffalo Subsidy : नमस्कार मित्रांनो, दुग्ध उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्यात राबवित असलेल्या दुधाळ जनावरे वाटप योजनेत काही प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे, दुधाळ जनावरे वाटप अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय योजनेत दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही आता जनावरे या योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार आहेत.

नावीन्यपूर्ण जिल्हा आणि राज्यस्तरीय योजना राबविण्यात येत होती. मात्र, त्यांच्या निकषात काही प्रमाणात तफावत दिसत होती ती तफावत आता दूर करण्यात आलेली आहे . या योजनेंतर्गत दोन दुधाळ देशी किंवा संकरित गायी किंवा दोन म्हशींच्या गटाचे वाटप या योजनेच्या माध्यमातून करण्यात येत असते. राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांचा गट दुग्धोत्पादनात वाढ करण्यासाठी देण्यात येत असते.

तसेच जिल्हास्तरीय नावीन्यपूर्ण आदिवासी क्षेत्र उपाययोजना या योजनेंतर्गतच राबविण्यात येते असते. सहा, चार आणि दोन जनावरांचा गट वाटप याअगोदर या योजनेंतर्गत करण्यात येत होता. त्याऐवजी दोन जनावरांचा गट वाटप करण्याच्या निर्णय मंत्रिमंडळाने सरसकट घेतलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा,सोलापूर कोल्हापूर,अहमदनगर व तसेच मुंबई आणि मुंबई उपनगर हे जिल्हे वगळून ही योजना राबविण्यात येत होती. मात्र, आता ही योजना राज्यभर राबविण्यात येत असते, दुधाळ देशी किंवा संकरित गायीसाठी या योजनेतून 70 हजार रुपये, व प्रतिम्हैस जवळपास 80 हजार रुपये देण्यात येत असतात.

दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, अत्यल्प भूधारक एक हेक्टरपर्यंत शेतकरी, अल्पभूधारक दोन हेक्टरपर्यंतचे शेतकरी, रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले सुशिक्षित बेरोजगार आणि महिला बचत गटातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ जिल्हास्तरीय योजनेंतर्गत देण्यात येत होता. मात्र 2015 पासून राज्यस्तरीय योजनेंतर्गत आतापर्यंत केवळ अल्पभूधारक शेतकरी, स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले सुशिक्षित बेरोजगार आणि महिला बचत गटाचे लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत होता. त्यामुळे याबाबतीत पावसाळी अधिवेशनात प्रश्न विचारण्यात आला होता. संयुक्तरित्या जर ही योजना राबविली जात असेल तर निकष वेगवेगळे का असावेत असा प्रश्न पावसाळी अधिवेशनात विचारण्यात आलेला होता.

लाभार्थींची क्रमवारीने निवड :-

राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात विचारलेल्या प्रश्‍नावर या योजनेत बदल करू असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता पाच निकष या योजनेचेही करण्यात आले असून खालीदिलेल्या क्रमवारीने निवड करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांची निवड करताना दारिद्र्य रेषखालील लाभार्थी, अत्यल्प भूधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार,व तसेच महिला बचत गटातील लाभार्थी असतील.

सूचना :- या योजनेबद्दल अजून अर्ज सुरू झालेले नाहीत. अर्ज सुरू झाल्याच्या नंतर आपल्याला कळविण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य शासनाचा नवीन GR पाहण्यासाठी

➡️➡️ येथे क्लिक करा ⬅️⬅️

Spread Love:

Leave a Comment