Sharad Pawar Gram Samrudhi Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण या वेबसाईटच्या माध्यमातून नव-नवीन योजना येतील किंवा इतर जे काही शासनाच्या महत्वाच्या जीआर असतील याच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो.ही माहिती घेत असताना शेतकऱ्यांच्या आता एक नवीन महत्त्वपूर्ण असे अपडेट आलेले आहे आणि ते म्हणजे गायगोठ्याची योजना सुरू झालेली आहे आणि याच्यासाठी अर्ज कसा केला जातो? याचा अर्जाचा नमुना मिळेल का? याच्यासाठी अटी शर्ती काय असतात? त्याच्यासाठी वृक्ष लागवड करावी लागते का? याच्यासाठी कागदपत्र काय लागतात? आणि अशी संपुर्ण माहिती आपण आता या लेखाच्या माध्यमातून या योजनेच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या योजनेची कोणती उद्देश आहेत ?
१) जे ग्रामीण भागातील असणारे गोरगरीब शेतकरी किंवा जे कर्ज लाभार्थी पात्र लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्याला वैयक्तिक व सार्वजनिक कामे हाती घेऊन याद्वारे कायमस्वरूपी मत्ता निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
२) जे असणारे ग्रामीण भागातील फक्त पुरेशा कामासाठी होणारे स्थलांतर थांबवणे.
३) हे नंतर जास्त गायगोठा,शेळीपालन शेड,कुक्कुटपालन शेड या कामासाठी आवश्यक असणारे जे अकुशल आणि कुशल कामगारांचे प्रमाण 60:40 या प्रमाणात संतुलित राहण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी या योजनेच्या विविध योजनांच्या जसे की, शेततळे वृक्ष लागवड फळबाग लागवड शोषखड्डे इत्यादी हे खर्चाचे प्रमाण हे जास्त असलेल्या योजनांच्या बाबी दिलेल्या प्रत्यक्ष शेतकरी समृद्ध होतील अशाप्रकारे या योजनेचे उद्देश आहेत.
या योजनेअंतर्गत कोणती कामे घेता येतात ?
- शेळीपालन शेड बांधणे
- कुक्कुटपालन शेड बांधणे
- भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग
- गाय आणि म्हैस यांच्या करीता पक्या गाय गोठ्यांचे बांधकाम करणे
या योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाते ?
1] गाय गोठा अनुदान :-
2-6 गुरांसाठी 1 गाय गोठा आणि यासाठी अनुदान 77 हजार 188 रुपये
6 पेक्षा जास्त जनावरे असतील तर दोन गोट्यासाठी 1 लाख 54 हजार 376 रुपये
आणि बारा पेक्षा जास्त गुरे असतील तर त्यासाठी तीन गोट्यांसाठी अनुदान हे 2 लाख 31 हजार 564 रुपये
2] शेळीपालन शेड अनुदान :-
2 ते 10 शेळ्यांसाठी एक शेड 49 हजार 284 रुपये
20 पेक्षा जास्त शेळ्या असतील तर दोन शेडसाठी 98 हजार 568 रुपये
30 पेक्षा जास्त शेळ्या असतील तर तीन शेडसाठी 1 लाख 47 हजार 852 रुपये
3] कुक्कुटपालन शेडबांधकाम अनुदान :-
100 पक्षांसाठी एकशेडसाठी 49 हजार 760 रुपये
150 पेक्षा जास्त पक्षांसाठी दोनशेडसाठी 99 हजार 520 रूपये इतके अनुदान दिले जाते.
4] भू-संजीवनी नाडे कंपोस्टिंग साठी अनुदान :-
शेतातील सर्वे कचरा हा एकत्र करून नाडे पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून यासाठी 10 हजार 537 रुपये अनुदान दिले जाते.
➡️➡️ अर्जाचा नमुना; येथे क्लिक करा ⬅️⬅️
➡️➡️ अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा ⬅️⬅️