ई -श्रम कार्ड काढण्यासाठी नवीन अर्ज सुरू, येथे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो,ई -श्रमिक कार्ड योजना देशातील कामगारांच्या संरक्षणासाठी आणि रोजगारासाठी केंद्र सरकार कडून ही योजना सुरू करण्यात आली होती. ई-श्रम पोर्टल असंघटित क्षेत्रामधील कामगारांच्या कल्याणासाठी रोजगार मंत्रालयाने हे पोर्टल तयार केलेले आहे.

EPFO व तसेच ESIC चे सदस्य या पोर्टलचा लाभ घेऊ शकत नसतात .जर आपल्याला ई-श्रमिक कार्ड बनवण्यासाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करायची असेल, तर आम्ही आपल्याला नोंदणी करण्याचा एक अतिशय सोपा मार्ग या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत. e shram card

आपण आपले ई-श्रमिक कार्ड कशा प्रकारे बनवू शकता आणि त्यासाठी आपल्याला कुठली कुठली महत्त्वाची कागदपत्रे लागनार आहेत याबद्दल जाणून घेऊयात. e shram card

आवश्यक कागदपत्रे – e shram card

आपल्याला ई-श्रम साइटवरती नोंदणी करण्यासाठी,

1)आपल्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.

2) तसेच आपला मोबाईल नंबर आधारशी लिंक केलेला पाहिजे.

3) आपले बँकेमध्ये अकाउंट असणे आवश्यक आहे.

4) तुमचे वय कमीत कमी 16 वर्ष असावे व जास्तीत जास्त 59 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

UAN नंबर –

UAN नंबर हा 12 अंकी अद्वितीय क्रमांक असतो,जो देशातील प्रत्येक कामगाराला ई-श्रम पोर्टलवरती नोंदणी केल्यानंतर दिला जात असतो,UAN क्रमांक हा कायमस्वरूपी कामगाराला देण्यात येत असतो,म्हणजेच एकदा नियुक्त केल्यानंतर तो आयुष्यभर त्या कामगाराकडे राहत असतो.

ई-श्रम कार्ड म्हणजे काय –

ई-श्रम पोर्टलवरती आपण यशस्वीपणे नोंदणी केल्यानंतर त्या कामगारांना ई-श्रम कार्ड जारी करण्यात येत असते . ज्यावरती 12 अंकी UAN क्रमांक दिलेला असतो.

स्वयं-नोंदणी ई-श्रम पोर्टलवरती केलेल्या कामगारांना इतर कुठल्याही सरकारी सामाजिक कल्याण कार्यक्रमासाठी स्वतंत्रपणे अर्ज करण्याची गरज नसते.

ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया-

1)आपल्याला सुरुवातीला ई-श्रम register.eshram.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

2) आता ई-श्रमवरील नोंदणीच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.

3) स्व-नोंदणी पृष्ठावर, आधारशी लिंक केलेला आपला मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड भरावा लागेल.

4)आता आपल्याला “ओटीपी पाठवा” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

5)आपल्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP टाकावा लागेल,आता आपल्या स्क्रीनवर ई-श्रमसाठी नोंदणीचा फॉर्म ओपन होईल .

6) आपल्याला वैयक्तिक, शैक्षणिक, पत्ता तपशील आणि बँक तपशील इत्यादी प्रविष्ट करावा लागेल आणि पूर्वावलोकन स्वयं-घोषणा पर्यायावर टिक करावे लागेल.

7)आपल्याला आपले UAN कार्ड प्राप्त होईल,जे पूर्वावलोकनानंतर आपण भविष्यातील वापरासाठी देखील डाउनलोड करू शकत असता.

ई-श्रम कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा

 येथे क्लिक करा

Spread Love:

Leave a Comment