आम्ही चाललो आमच्या गावा आमचा राम-राम घ्यावा ! पावसाचा जोर ओसरला, ‘या’ तारखेपासून हवामान कोरडे होणार

Havaman Andaj : गेल्या महिन्यात मनसोक्त बरसलेला पाऊस आता माघारी फिरणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील हवामान लवकरच कोरडे होणार आहे. आता राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असून याचा परिणाम म्हणून पावसाचा जोर देखील हळूहळू कमी होणार असल्याची माहिती IMD ने दिली आहे.

आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता आता बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. यामुळे आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर ओसरणार असल्याचे सांगितले जात आहे. खरंतर अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता.

मात्र आता मुसळधार पावसाला फुल स्टॉप लागणार आहे. कारण की अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आता विरणार आहे. कमी दाब क्षेत्राची आता हळूहळू तीव्रता कमी होणार आहे. मात्र असे असले तरी महाराष्ट्रावर असलेल्या बाष्पामुळे आगामी दोन दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.

पण दोन दिवसानंतर महाराष्ट्रातील बहुतांशी भागातील हवामान कोरडे होण्यास सुरुवात होणार आहे. 5 ऑक्टोबर नंतर राज्यातील कोकण वगळता इतर भागातील हवामान कोरडे होण्यास सुरुवात होणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

केव्हा सुरु होणार परतीचा प्रवास?

यावर्षी मानसून भारताच्या मुख्य भूमीवर अर्थातच केरळात उशिराने दाखल झाला. महाराष्ट्राच्या तळ कोकणात देखील यावर्षी उशिराने मान्सूनचे आगमन झाले. राज्यात जून अखेर मान्सून सर्वत्र पोहोचला. मात्र जून मध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची हजेरी लागली.

मानसूनचे उशिराने आगमन झाले असल्याने जूनमध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला. परंतु जुलै महिन्यात राज्यात सर्व दूर मुसळधार पाऊस बरसला आणि याचा परिणाम म्हणून जून महिन्यातील पावसाची तूट बऱ्यापैकी भरून निघाली. अशातच मात्र ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाचा मोठा खंड पडला आणि संपूर्ण खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली.

ऑगस्ट महिन्यात तब्बल वीस ते पंचवीस दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. यामुळे महाराष्ट्र जवळपास दुष्काळाच्या उंबरठ्यावर आला होता. अनेक ठिकाणी पाणी संकट तयार झाले होते. धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढत नव्हता. धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला होता. यामुळे शेती पिके संकटात आली होती.

पावसाच्या अभावामुळे बहुतांशी भागातील शेती पिके करपली होती. अशातच मात्र सप्टेंबर महिन्याची सुरुवात शेतकऱ्यांसाठी आशादायी ठरली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला. गणेशोत्सवाच्या काळात पावसाचा जोर वाढला. सप्टेंबर महिन्यात राज्यातील जवळपास सर्वच भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची हजेरी लागली.

आता मान्सून अंतिम टप्प्यात पोहोचला असून हवामान खात्याने 10 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र, राज्यातील कोकण वगळता उर्वरित भागातुन 5 तारखेनंतरच हवामान कोरडे होण्यास सुरुवात होणार आहे.

Spread Love:

Leave a Comment